Ad will apear here
Next
महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल
टाटा मोटर्सने तयार केल्या मिडी बसेस

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी टाटा मोटर्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सहा अल्ट्रा नाईन एम डिझेल मिडी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी २७ बसेस दाखल होणार आहेत. 

अल्ट्रा व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या या बसेस चालक, वाहक आणि प्रवासी अशा सर्वांच्याच सोयीच्या आहेत. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनमुळे (एएमटी) चालकांना बस चालवताना आरामदायी अनुभव मिळतो. महिला प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन या बसमध्ये फायर डिटेक्शन अॅंड सस्पेंशन सिस्टीम (एफडीएसएस) यासारख्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सुविधा देण्यात आल्या आहेत. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स (आयटीएस) देण्यात आली आहे. जीपीएसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डेस्टिनेशन डिस्प्ले बोर्डही कार्यरत आहेत. यातील इनबिल्ट टेलिमॅटिक्स प्रणालीच्या साह्याने स्टेट ट्रान्सपोर्ट युनिट्सना (एसटीयू) संपर्काच्या अधिक सुविधा मिळतील. गाडीची देखभाल करणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे या गोष्टी सोप्या होतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZTEBX
Similar Posts
पुण्यात लवकरच धावणार २५ एसी इलेक्ट्रिक बस पुणे : ‘पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात २६ जानेवारी रोजी २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत.
सिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना सिंगापूर येथे होणाऱ्या प्रतिष्ठीत अशा ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सिंगापूर येथे येत्या २२ व २३ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद होणार असून, परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे
कामगार संघटनेच्या निवडणुकीत व्यवस्थापनाचा ह्स्तक्षेप नाही पुणे : टाटा मोटर्स कामगार संघटनेची शनिवार, २२ जून रोजी निवडणूक होत असून, यात कंपनी व्यवस्थापनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
टाटा मोटर्सच्या कामगार संघटनेची निवडणूक शांततेत पुणे : पिंपरी चिंचवडमधील उद्योगक्षेत्राचे लक्ष वेधून घेणारी टाटा मोटर्स एम्पलॉईज युनियनची (टीएमईयू) निवडणूक शनिवारी शांततेत पार पडली. पुढील तीन वर्षांसाठी १५५ उमेदवारांमधून ३१ प्रतिनिधी निवडण्यात आले. ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही महाराष्ट्रातील एक सर्वांत मोठी कर्मचारी युनियन आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language